Sarthak Foundation invites young blood to volunteer a hand in social cause of Sarthak Group. What will you get, may not be monetary but we ensure inner peace.
To work for underprivileged parts of the society. To fulfil their basic requirement of food, health and education.
Providing hope, love and resources for those without life's essentials.
We have volunteers from all the walks of life; from doctors, teachers, students, social workers to IT professionals.
Sarthak Foundation has worked with old age homes, orphanages, blind schools and also organized various camps like blood donation camps, health check-up camp for women in the remote areas.
Women's Day Celebration at Tarachand Ramnath Shaikshanik Sankul, Karvenangar, Pune - 52.
Donated 2 Computers, 3 Bookshelves, Masala Kandap (Pounding) machines...
Donated Sewing Machine, Grocery of 3 to 4 months, Daily Essentials...
सार्थक फाऊंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाळवडी, ता. भोर, जिल्हा पुणे. यांचे एक अतूट नाते.
आज "अभ्यासाचं गाव" म्हणून ओळखले जाणारे मौजे म्हाळवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे या आदर्श गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांनी आपल्या गावातील शाळा कशी नावारूपाला येईल यासाठी नवनवीन संकल्पना राबवून अहोरात्र कामाला सुरुवात केली. या कामी गावातील एक उमदा तरुण मा. राजेश भाऊ बोडके या सर्व उत्साही शिक्षकांच्या मदतीला धावून आला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,समाजासाठी, समाजसुधारणेसाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपण अहोरात्र काम केले पाहिजे,असे समाजसेवेचे व्रत घेऊन निर्माण झालेली "सार्थक फाऊंडेशन" मा. राजेश भाऊ बोडके यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नांतून आमच्या म्हाळवडी गावात आली.
आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती पाहून, सार्थक फाऊंडेशनने शाळेच्या गरजा जाणून घेतल्या तसेच सर्व शिक्षकांशी चर्चा करून अजून कोणत्या कोणत्या गोष्टींची शाळेसाठी आवश्यकता आहे, याची विचारपूस केली. सध्याच्या काळातील अत्यावश्यक गरज म्हणजे मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यावश्यक आहेत हे जाणून, आम्ही मागितलेले क्रीडा व योगाचे साहित्य आमच्या शाळेला पुरवले. असे हे सामाजिक बांधिलकी जपणारे सार्थक फाऊंडेशन आम्हाला एक वेगळीच प्रेरणा देऊन गेले आणि याच प्रेरणेतून आमच्या हातून म्हाळवडी गावात वेगवेगळे विधायक उपक्रम राबवले गेले, आजही राबवले जात आहेत आणि भविष्यातही नक्कीच राबवले जाणार आहेत. गावातील तरूण, उमलते नेतृत्व माननीय राजेश भाऊ बोडके व त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांच्या मते अशा समाजोपयोगी उपक्रमासाठी गरज असते ती सर्वांच्या योगदानाची. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की, दिव्याची एक दीपमाळ तयार होते, तसेच फुलाला फूल जोडत गेलं की, फुलांचा एक पुष्पहार होतो.
समाजाच्या हितासाठी काहीतरी करावे,सार्थक फाऊंडेशनच्या याच प्रेरणेतून म्हाळवडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मा. राजेश भाऊ बोडके यांच्या सहकार्याने व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आपल्यासारख्या संस्थेच्या सहकार्याने गावात एक अभिनव उपक्रम राबवला आणि तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असताना इंटरनेट अभावी मुलांचे शिक्षण मागे पडू नये, त्यांना शाळेशी आणि अभ्यासाशी अनोख्या पद्धतीने जोडण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी गावामध्ये बोलक्या भिंती तयार करण्याचा. गावातील सर्व भिंतीवर शिक्षणाची गोडी निर्माण करणारे अभ्यासाचे विषय रेखाटले गेले. याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. सार्थक फाऊंडेशन व मा. राजेश भाऊ बोडके यांच्या सहकार्याने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाची दखल फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने घेतली आहे.